चिंचोली येथे संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित रक्तदान शिबिरात 78 जणांनी केले रक्तदान
1 min read
घोडेगाव दि.१९:- आध्यात्मिकताच मानवी एकता मजबूत करू शकते आणि माणसांना एकमेकांच्या जवळ आणून परस्पर प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करू शकते. त्याच हेतूने निरंकारी ‘सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज’ यांच्या कृपाशीर्वादाने चिंचोली (ता आंबेगाव,पुणे) येथे संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा,
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार,15 मार्च 2026 रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये मिशनचे अनुयायी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन 78 युनिट रक्त संकलन वाय सी एम रुग्णालय रक्तपेढीला देण्यात आले.
संत निरंकारी मिशनद्वारे निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला होता कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, तर ते नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’ म्हणून संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे अमलात आणला असून आज वर्तमान काळात निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर हा पुढे नेला जात आहे.
संत निरंकारी मिशन तर्फे घोडेगाव परिसरामध्ये मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांचे विशेष योगदान लाभले. दरम्यान रक्तदान जागृती जनसामान्यांमध्ये व्हावी यासाठी घोडेगाव परिसरात घरोघरी जाऊन रक्तदानाचा संदेश देखील पोहोचविण्यात आला.
या शिबीराचे उद्घाटन/शुभारंभ चिंचोलीचे मा सरपंच तथा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विलास आप्पा कोकणे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती कैलास काळे पाटील, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक दत्ताभाऊ कोकणे पाटील सह अनेक प्रतिष्टीत व्यक्ती,
मान्यवर, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील या शिबिरास सदिच्छा भेट दिली. अनेक संत निरंकारी मिशनचे अनुयायी आवर्जून उपस्थित होते. शेवटी आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार घोडेगाव शाखेचे प्रमुख अजित महाराज कोकणे यांनी मानले.
