ललिता पारवे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

1 min read

आळेफाटा दि.१७:- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आनंदी युनिवर्स फाऊंडेशन च्या वतीने कोळवाडी (ता.जुन्नर) गावच्या विद्यमान सरपंच ललिता पारवे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार व ग्रामपंचायत सदस्य अर्चना उत्तम सहाणे यांना आदर्श ग्रामसंघ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. आदर्श विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर व महिला सक्षमीकरण या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे, स्मिता कणसे, पंचायत समिती सदस्य सपना शिंदे, भाऊ कुऱ्हाडे, प्रसन्न डोके, अजित सहाणे, राजू पारवे, संजय गाढवे, संजय गुंजाळ, म्हतू सहाणे यांनी पुरस्कारार्थीचें अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!