रॉयल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

1 min read

पिंपरी-चिंचवड दि.१७:- रॉयल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अंतर्गत रॉयल प्री-स्कूल (संतनगर सेक्टर ४, शिवाजीवाडी, दक्षिण लक्ष्मीनगर) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. “Roots and Wings (Me, Mom, Dad)” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. हा कार्यक्रम आचार्य अत्रे ऑडिटोरियम, नेहरू नगर (पीसीएमसी) येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक पै. सुरेश कदम संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. भूषण बोराडे व घरकुल रिअल इस्टेट, पुणेचे चेअरमन प्रशांत पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महापालि केचे नगरसेवक अर्चना राजेश सास्ते, नम्रता लोंढे आणि विलास मडगिरी उपस्थित होते.स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषेतून नृत्य, गाणी आणि नाटिका सादर करून पालक व प्रेक्षकांची दाद मिळवली.“Roots and Wings(Me,Mom,Dad)” या संकल्पनेतून पालक आणि मुलांमधील नाते, संस्कार आणि कुटुंबातील आपुलकीचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार झाला.या कार्यक्रमाचे आयोजन रॉयल एज्युकेशनल इन्स्टिट्यू शन्सच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.संस्थेच्या अध्यक्षा स्वाती ढेरंगे, प्राचार्य सुप्रिया तसेच मंदाकिनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमा साठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाला पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली आणि संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!