रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी व प्रितम प्रकाश काॅलेजच्या वतीने नारिशक्ती महिला सन्मान सोहळा संपन्न

1 min read

भोसरी दि.१६:- रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी व प्रितम प्रकाश काॅलेजच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारिशक्ती महिला सन्मान २०२६ सोहळा संपन्न झाला.यानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य व डॉ.डि.वाय.पाटील पिंपरीच्या HOD व्याख्यात्या मा.निता मोहिते यांचे नारी ते नारायणी या विषयावर व्याख्यान झाले.खालील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच महिलांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मिनाक्षी नरहरे (अधीक्षक,डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह मोशी), डॉ ‌प्रिती व्हिक्टर (संस्थापिका डिवाईन काॅज सोशल फाउंडेशन, पुणे), सुंदर कुऱ्हाडे (संस्थापिका अन्नपूर्णा प्रतिष्ठान), कोमल साळुंखे (संचालिका,शाहू शिक्षण संस्था, सोलापूर), सुलभा मुंगी(मुख्याध्यापिका,आनंद ऋषीजी इंग्लिश मेडियम स्कूल, पुणे) या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणीमाई पठारे, नगरसेविका सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवी लांडगे यांच्या सौभाग्यवती माजी नगरसेविका मा.डॉ.श्रद्धा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी व रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी चार्टर प्रेसिडेंट रो.प्रा.डाॅ.अशोककुमार पगारिया,प्रितम प्रकाश‌ काॅलेजचे प्राचार्य सदाशिव कांबळे,रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष.रो.डाॅ.संतोष मोरे यांच्यासह माजी अध्यक्ष रो.ज्ञानेश्वर विधाते, रो.दीपक सोनवणे,रो.आण्णासाहेब मटाले,रो.सुनिल पाटे पाटील, रो. प्रा.सचिन पवार,हे उपस्थित होते.अध्यक्ष रो.डाॅ.संतोष मोरे यांनी प्रास्ताविक केले.प्रा.डाॅ.अशोककुमार पगारिया यांनी पुरस्कारार्थींचे कौतुक केले.सर्वच पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती यांनी मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी व‌ प्रितम प्रकाश काॅलेज यांनी केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.रो.प्रा.सचिन‌ पवार यांनी प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!