जुन्नरच्या वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीमला आदर्श स्वयंसेवी संस्था पुरस्कार

1 min read

पुणे दि.१६:- वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम संस्था, जुन्नर यांना आदर्श स्वयंसेवी संस्था पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले. Word For Nature, पुणे यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा सन्मान प्रख्यात सर्प अभ्यासक व निसर्ग अभ्यासक Neelam Kumar Khaire यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.तसेच Shubham Pandey, संस्थापक अध्यक्ष, यांनी संस्थेच्या कार्याची दखल घेऊन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला.वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम संस्था, जुन्नर ही संस्था गेल्या काही वर्षांपासून वन्यजीव, पशु-पक्षी, साप तसेच बिबट्या यांच्या रेस्क्यू व संरक्षणा साठी सातत्याने कार्य करत आहे. ग्रामीण व शहरी भागात घरात किंवा मानवी वस्तीत आलेल्या सापांचे सुरक्षित रेस्क्यू करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणे, जखमी वन्यप्राण्यांना उपचारासाठी मदत करणे तसेच नागरिकांमध्ये वन्यजीवांविषयी जनजागृती करणे अशा विविध उपक्रमांद्वारे संस्थेने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.तसेच सर्पदंश प्रतिबंधाबाबत जनजागृती, शाळा-महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन, वन्यजीव संरक्षणाबाबत लोकांना माहिती देणे, तसेच जंगलातील आग, वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन याबाबत संस्था सातत्याने काम करत आहे. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांना वन्यजीवांविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत झाली आहे.या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आकाश माळी यांच्यासह दीपक माळी, सतीश घाडगे, ऋषी वावळ आणि प्रज्ञेश काशी केदार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारण्यात आला. या सन्मानामुळे संस्थेच्या कार्याला अधिक बळ मिळाले असून,भविष्यातही वन्यजीव संवर्धन व पर्यावरण रक्षणा साठी अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.या सन्मानामुळे संस्थेच्या कार्याला अधिक प्रेरणा मिळणार असून, पुढील काळातही वन्यजीव संवर्धनासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!