युद्धातून गुंतवणूकदारांचे २३.४४ लाख कोटींचे नुकसान

1 min read

मुंबई दि.१५:- अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्ष सुरू झाल्यापासून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २३.४४ लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ६ टक्क्यांहून अधिक घसरला आहे.अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर लष्करी हल्ले केला आणि तेव्हापासून शेअर बाजारात घसरणीचे भीतीदायी पडसाद उमटले आहेत.इराणने प्रत्युत्तरादाखल संयुक्त अरब अमिराती, बहारीन, कुवेत, जॉर्डन आणि सौदी अरेबियासह अनेक आखाती देशांमधील इस्रायली आणि अमेरिकी लष्करी तळांवर हल्ले सुरू केले आहेत. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी, पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात देखील तेलवाहू जहाजांवर हल्ले केले आहेत. या भागातून सुमारे २० टक्क्यांहून जागतिक तेल आणि एलएनजीचा (द्रवीभूत नैसर्गिक वायू) पुरवठा होतो. ब्रेंट क्रूडच्या किमतीत गुरुवारी ६.६६ टक्क्यांची वाढ होऊन तो प्रतिपिंप १०० अमेरिकी डॉलरवर पोहोचले आहे.

सेन्सेक्समध्ये २७ फेब्रुवारीपासून, ६.४६ टक्क्यांची म्हणजेच ५,२५२.७७ अंशांनी घसरण झाली आहे. या काळात मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २३.४४ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ४४०.०६ लाख कोटी रुपयांपर्यंत (४.७७ ट्रिलियन अमेरिकी डॉलर) खाली आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!