हिंदुस्तान कॅटल फीड्स समूहाच्या वतीने विद्यार्थांना टिफिन व टिफिन बॅग वाटप

1 min read

लाखणगाव दि.१५:- हिंदुस्तान कॅटल फीड्स, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर या उद्योग समूहाच्या वतीने सीएसआर फंडातून NCRDs न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव शाळेतील आठवी व नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्टीलचे टिफिन व उत्तम कॉलिटी च्या टिफिन बॅग अंदाजे रुपये २७०००/- किंमतीचे साहित्य मोफत वितरण करण्यात आले. यासाठी हिंदुस्तान फिड्स चे मच्छिंद्र महाजन (मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह), किरण नरवडे (सेल्स ऑफिसर) हे शाळेत प्रत्यक्ष उपस्थित होते. तथा लाखणगाव ब्रिटानिया डेअरीचे चेअरमन विशाल मिंडे यांनी सदर साहीत्य मिळण्यासाठी अथक परिश्रम, अनमोल सहकार्यने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. कार्यक्रमास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गाडगे, उद्योजक सोमनाथ पोंदे मुख्याध्यापक अनिल देसले, शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!