कॅम्पस ड्राईव्हमध्ये ‘मदरसन’ नामांकित कंपनीत सह्याद्रीच्या ३८ विद्यार्थ्यांची निवड

1 min read

राजूरी दि.१३:- राजूरी येथील सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राजुरी (ता.जुन्नर) येथे आयटीआय आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये ‘मदरसन'(रांजणगाव एमआयडीसी) या नामांकित कंपनीत ३८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. महरिया चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार सचिन चव्हाण आणि अकॅडेमिक डीन पी. बालरामडू यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख मुरलीधर कुरकुटे यांनी या यशाची माहिती दिली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या मोठ्या संधीबद्दल संस्थेच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!