दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त स्मृतीस विनम्र अभिवादन

1 min read

निमगाव सावा दि.१३:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचालित दिलीप वळसे पाटील महाविद्यालय निमगावसावा आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आयोजित
यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त महाविद्यालयात त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे व शांताराम गाडगे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. घोडे यांनी केले. त्यांनी आपल्या सूत्रसंचालनातून यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय वाटचालीबद्दल माहिती दिली आणि त्यांच्या नेतृत्वगुणांवर प्रकाश टाकला.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या मनोगतात यशवंतराव चव्हाण यांच्या लहानपणापासूनच्या संघर्षमय जीवनाची माहिती दिली. तसेच समाजाच्या विकासासाठी आणि भारतीय सैन्यासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला.इतिहास विभाग प्रमुख प्रा. नीलम गायकवाड यांनी आपल्या भाषणात यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनात त्यांच्या आईचे असलेले महत्त्वपूर्ण योगदान स्पष्ट केले. त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व घडवण्यात आईच्या संस्कारांची भूमिका अधोरेखित केली. शेवटी त्यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली आणि कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!