नारायणगावात ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान तर्फे महिला सन्मान सोहळा संपन्न

1 min read

नारायणगाव दि.१३:- नारायणगाव (ता.जुन्नर) येथील ताराई कृषी पर्यटन केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधत तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे होते. यावेळी गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, नारायणगाव लोकनियुक्त सरपंच डॉ.शुभदा वाव्हळ, शिक्षण विस्तार अधिकारी अनिता शिंदे,डॉ. पल्लवी राऊत,डॉ.केतकी काचळे,सबनीस विद्यामंदिरातील पर्यवेक्षिका अनुपमा पाटे, ॲड.भाग्यश्री नलावडे,महिला पोलीस सुमित्रा तळपे,आशा वर्कर अश्विनी वारुळे,उद्योजिका अश्विनी कोल्हे व कावेरी कोल्हे यांचा फेटा बांधून तसेच सन्मानचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर,जुन्नर तालुका अध्यक्ष रमाकांत कवडे,सानेगुरुजी कथा माला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे,तालुका शिक्षक पतसंस्थेचे सभापती सचिन मुळे,संचालक रवींद्र वाजगे, अंबादास वामन,जितेंद्र मोरे,केंद्रप्रमुख दिनेश मेहेर,प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष शरदराव शिंदे,सुरेश गडगे,रियाज मोमीन, सुनील हाडवळे,मनोहर वायकर,मनीषा कानडे आदी मान्यवर,प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शांताराम डोंगरे यांचा बापू फेम होम मिनिस्टर हा कार्यक्रम उपस्थितां साठी घेण्यात आला.या कार्यक्रमातील विजेत्या सुरेखा बटवाल,वैशाली फुलसुंदर,निर्मला मेहेर व वनिता गडगे यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे साहेब तसेच पुरस्कारार्थी सरपंच डॉ.शुभदा वाव्हळ, गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे,विस्तार अधिकारी अनिता शिंदे,पर्यवेक्षिका अनुपमा पाटे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष कमलाकांत मुंढे यांनी तर सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव रुपेश पवार यांनी केले तर आभार उपाध्यक्ष उर्मिला वाजगे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!