प्रियकराने फोनवर ‘ब्लॉक’ केल्याच्या रागातून आणि नैराश्यातून तरुणीची चालत्या लोकल ट्रेनमधून उडी

1 min read

मुंबई दि.११:- प्रियकराने फोनवर ‘ब्लॉक’ केल्याच्या रागातून आणि नैराश्यातून एका २० वर्षीय तरुणीने चालत्या लोकल ट्रेनमधून वाशी खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी ८:३० च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.सुदैवाने,वेळीच देवदूतासारख्या धावून आलेल्या मच्छिमारांमुळे या तरुणीचे प्राण वाचले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी चेंबूरची रहिवासी असून ती हार्बर लाईनच्या लोकलने प्रवास करत होती. वाशी खाडी पुलावर ट्रेन येताच तिने दरवाजातून थेट खाडीत उडी घेतली. मात्र, तिच्या खांद्यावर सॅक (बॅग) अडकलेली होती, ज्यामध्ये हवा भरली गेल्याने ती पाण्यावर तरंगत राहिली.वाशी गावातील मच्छिमार महेश सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तरुणीला पाण्यात पडताना पाहिले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली बोट त्या दिशेला वळवली आणि बुडणाऱ्या तरुणीला सुखरूप बाहेर काढले. या साहसी कामगिरीमुळे तरुणीचे प्राण वाचले असून तिची प्रकृती आता स्थिर आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!