टी-20 वर्ल्ड कप नंतर आता आयपीएलचा थरार रंगणार; वेळापत्रक जाहीर

1 min read

मुंबई दि.१२:- टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहते आयपीएल 2026 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 28 मार्चपासून आयपीएल 2026 च्या मोसमाला सुरूवात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक आज बुधवारी जाहीर करण्यात आलं आहे. पहिला सामना 28 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरूध्द सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.हा सामना बेंगळुरू मधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. सर्वसाधारणपणे आयपीएलचा पहिला सामना गतवर्षी अंतिम फेरीचा सामना खेळणाऱ्या दोन संघांमध्ये होत असतो. यावेळी मात्र आयपीएलकडून यात बदल करण्यात आला आहे.आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याऐवजी आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. बीसीसीआयने नुकतेच पहिल्या 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे; उर्वरित सामन्यांची घोषणा नंतर केली जाईल. आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्यात देशभरातील 10 शहरांमध्ये एकूण 20 सामने होतील. आयपीएलचे सामने बेंगळुरू, मुंबई, गुवाहाटी, न्यू चंदीगड, लखनौ, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबाद येथे होतील. बीसीसीआयने आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सध्याचे वेळापत्रक २८ मार्च ते १२ एप्रिल पर्यंत आहे. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर केले जाईल. पहिला सामना सध्याच्या आयपीएल चॅम्पियन आरसीबी आणि एसआरएच (सनरायझर्स हैदराबाद) यांच्यात होईल. हा सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे. दुसरा दिवस रविवार आहे आणि या दिवशी मुंबई इंडियन्स मुंबईत केकेआर विरुद्ध खेळणार आहेत. या वर्षीचा पहिला डबलहेडर ४ एप्रिल रोजी खेळला जाईल, हा दिवस शनिवार आहे. दिवसाच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स दुपारी ३ वाजता एकमेकांसमोर येतील. त्यानंतर संध्याकाळी गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!