जुन्नरमध्ये वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
1 min read
जुन्नर दि.११:- निसर्ग, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणाच्या पवित्र उद्दिष्टाने कार्यरत असलेल्या वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम संस्था, जुन्नर यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला.
या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील विविध भागांतून वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्था, सर्पमित्र, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या मुख्य उपस्थितीमध्ये सर्पदंश तज्ञ डॉ. सदानंद राऊत, माजी सैनिक मेजर रमेश खरमाळे, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा शेख,
वर्ड फोर नेचर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुभम पांडे, तसेच जुन्नर वनविभागाचे वनपाल गणेश बागडे, वनपाल अनिल सोनवणे, वनरक्षक विशाल गुंड आणि वनरक्षक कैलास भालेराव हे मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचे कौतुक करत अशा संस्थांचे कार्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम संस्था, जुन्नर चे अध्यक्ष आकाश माळी, उपाध्यक्ष दीपक माळी, सचिव हेमंत गाडगे, खजिनदार सतीश घाडगे, उपकार्याध्यक्ष सुरेश गायकवाड, सल्लागार आदित्य हांडे, ऋषी वावळ आणि प्रज्ञेश काशीकेदार यांसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.
सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.कार्यक्रमादरम्यान वन्यजीव संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्था व कार्यकर्त्यांना “वन्यजीव निसर्ग रक्षक पुरस्कार” प्रदान करून त्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या सन्मानामुळे वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना नवीन प्रेरणा मिळाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीलजी डोंगरे यांनी करत संस्थेच्या कार्याची माहिती उपस्थितांसमोर मांडली. त्यांनी संस्थेने गेल्या वर्षभरात केलेल्या वन्यजीव रेस्क्यू, जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
या कार्यक्रमामुळे जुन्नर परिसरात वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली असून भविष्यातही संस्था अशाच प्रकारे समाजासाठी आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कार्यरत राहणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
