विशाल फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा
1 min read
आळे दि.१०:- विशाल फार्मसी महाविद्यालयात दिनांक ९ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अनुष्का शिंदे (एम.डी. होमिओपॅथी) यांना आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी डॉ. शिंदे यांनी विद्यार्थिनींना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
संतुलित आहाराचे महत्त्व, नियमित व्यायामाची गरज आणि निरोगी जीवनशैली कशी राखावी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच किशोरवयीन मुलामुलींमध्ये मोबाईल व सोशल मीडियाचा वाढता वापर, त्याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम याविषयीही त्यांनी जागरूकता निर्माण केली.
यासोबतच स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक ओळखून जबाबदारीने वागण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.डी.डी.गायकवाड तसेच व्ही.जे.एस. एम. आयओपीचे प्राचार्य डॉ. आर. ए. हांडे उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. डॉ. अनुष्का शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे आभार मानण्यात आले.
