पानसरे हॉस्पिटल च्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

1 min read

बेल्हे दि.१०:- प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे व डॉ. पानसरे हॉस्पिटल आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी गरोदर महिलांची तपासणी, प्रसुती पश्चात तपासणी पाळीच्या समस्या, गर्भाशयाचे आजार, कर्करोगाचे निदान, कुटुंब नियोजन व व्यंधत्व तपासणी व महिलांच्या विविध आजारांची तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी १२८ महिलांनी या आरोग्य तपासणीचा व मार्गदर्शनाचा लाभ घेतला. पानसरे हॉस्पिटलचे डॉ.प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ.प्रशांत पानसरे तसेच यांचे उपस्थित महिलांनी आभार मानले. महिला दिनानिमित्त प्राथमिक केंद्रातील आरोग्य कर्मचारी महिलांचे भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.तर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महिलांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फड, गावच्या सरपंच मनीषा डावखर, रानमळा गावच्या सरपंच सविता तिकोने, ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी यांसह गावातील सर्व डॉक्टर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!