पीएम किसान योजनेचा हप्ता ‘या’ तारखेला येणार

1 min read

दिल्ली दि.१०:- पीएम किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याची (PM Kisan 22nd Installment) प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच हा हप्ता जमा होणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता 13 मार्च रोजी जमा होऊ शकतो. केंद्र सरकारने पण याविषयीची अधिकृत तारीख घोषीत केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पीएम किसानच्या अधिकृत खात्यावरून सरकारने अंतिम तारखेची घोषणा केली आहे. पीएम किसानच्या अधिकृत खात्यावरून याविषयीची एक पोस्ट करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!