सह्याद्री व्हॅलीत ‘जागतिक महिला दिन’ साजरा

1 min read

राजुरी दि.९:- महरिया चॅरिटेबल ट्रस्टच्या सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राजुरी (ता.जुन्नर) येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण, अकॅडमिक डीन पी. बालरामुडू आणि सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलचे प्राचार्य सचिन डेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अकॅडमिक डीन यांनी आपल्या भाषणातून महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक आणि शिक्षकेतर (Non-teaching) कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!