शिरोली – बोरी शाळेत सांस्कृतिक कला महोत्सव उत्साहात साजरा
1 min read
बेल्हे दि.१० :- नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा शिरोली बोरी (ता.जुन्नर) येथे सांस्कृतिक कला महोत्सव २०२६ साजरा केल्याची माहिती मुख्याध्यापक अंबादास वामन व न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक योगेश शेळके यांनी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा शिरोली बोरी, न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बोरी व गावातील सर्व अंगणवाड्या यांनी नुकताच सांस्कृतिक कला महोत्सव २०२६ साजरा केला. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच प्रिया खिलारी व माजी सरपंच जयसिंग गुंजाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी शरद मुळे, सुनिल खिलारी, अजित खिलारी,भास्कर खिलारी, एकनाथ गुंजाळ, दत्तात्रय डावखर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कला महोत्सवात अनेक पारंपारिक व सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने विविध गीतांचे व नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्राथमिक शाळेच्या, माध्यमिक शाळेच्या व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, पुणे जिल्हा वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ. पंजाबराव कथे, नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण सपांगे, नवनियुक्त पंचायत समितीचे सदस्य संभाजी चव्हाण,
रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष डॉक्टर उत्तमराव घोरपडे, शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे, चंद्रकांत डोके यांनी आपली मनोगत व्यक्त केली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेत उत्कृष्ट काम केलेल्या व बदली होऊन गेलेल्या रोहिणी गिलबिले, सुनंदा ढगे,
सुमन चिखले, रोहिदास साळवे व महेंद्र बोऱ्हाडे या शिक्षकांचा गटशिक्षणाधिकारी यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांच्या व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे व रामभाऊ सातपुते गुरुजी यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
वतीने उत्कृष्ट कार्यक्रम सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष गणेश खिलारी, उपाध्यक्ष रविंद्र आगळे, राज्य संघाचे नेते मंगेश मेहेर, सभापती सचिन मुळे,राजू पोळ, हभप तुकाराम महाराज डावखर, बाळासाहेब गिलबिले, सचिन सातपुते, रखमा खिलारी,
अनिल खिलारी, अरुण खिलारी, तुषार डावखर, सुभाष खिलारी, मंगेश खिलारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. सर्वांसाठी शिक्षकांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्रशांत गायकवाड, मयूर कसाळ, उषा भारती, राजश्री आहेर, अमन मनियार, मनीषा चौधरी, वैशाली सातपुते, प्रांजल खिलारी यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, जुन्नर तालुक्यातील शिक्षक, रोटरी क्लब चे अनेक पदाधिकारी, उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाची प्रास्ताविक एकनाथ तट्टू यांनी केले सूत्रसंचालन पांडुरंग जाधव, प्रतिक्षा खिलारी व वैष्णवी जाधव यांनी केले. आभार हमीद पटेल यांनी मानले.
