जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भोपळ्यांच्या घारग्यांच्या मिष्टान्न भोजनाचे आयोजन

1 min read

आळेफाटा दि.८:- नेहमीच आगळे वेगळे उपक्रम करणारी पुणे जिल्ह्यातील आदर्श प्राथमिक शाळा वडगाव आनंद (ता.जुन्नर) या शाळेतील परसबागातील सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भोपळ्यांच्या घारग्यांच्या मिष्टान्न भोजनाचे आयोजन शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीने केले होते, याचे औचित्य साधून पुणे जिल्हा परिषद कार्यालयाकडून शाळेचे शिक्षण तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डी . बी.नाना वाळुंज यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करून उभारण्यात आलेल्या नूतन वर्ग खोलीचे उद्घाटन तसेच आजच्या स्पर्धेच्या युगातील शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान परिपूर्ण मिळावे, यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले, शिक्षण प्रेमी डी.बी. नाना वाळुंज व सर्व शिक्षकांनी एकमताने शाळेत 26 संगणक सुविधा उपलब्ध केली असून एवढेच नव्हे तर वाढत्या उष्णतेचा विचार करून संगणक कक्षाला वातानुकूलित कक्ष केला असून याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीने नवनिर्वाचित जि.प .सदस्य मंगेश काकडे व पंचायत समिती सदस्या सपना शिंदे. तसेच ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच रेलिका जाधव व त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. शाळेतील सर्व सोयीसुविधांचा लेखाजोखा सर्व मान्यवरांनी घेतल्यामुळे जि. प.सदस्य मंगेश काकडे यांनी इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांना आपली शाळा सहज स्पर्धा करू शकते, नव्हे तर येथील शिक्षक भारताची नवीन पिढी घडवण्यात अग्रेसर आहेत, असे प्रतिपादन केले. पंचायत समिती सदस्या सपना शिंदे यांनी शाळेच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन या कार्यक्रमाच्या वेळी दिले. मिष्टान्न भोजन विद्यार्थ्यांना व पाहुण्यांना बनवण्यासाठी मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित राहून चवदार असे मिष्टान्न भोजन तयार करून शाळेचा इतिहासात माता पालकांनी आपले नाव नोंदवून नोंदविले. पंचायत समिती सदस्या सपना शिंदे व त्यांचे पती जीवन शिंदे या उभयतांनी मुलांच्या पंक्तीत पाहुणचार करत रुचकर भोपळ्याच्या पुऱ्या, कांदा भजी, मसालेभात. यांचा मनमुराद आस्वाद घेतला.तसेच तालुक्याचे गटशिक्षणाधि कारी अशोक लांडे यांनी देखील कार्यक्रमाचे कौतुक करत मुख्याध्यापक, शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य त्याचप्रमाणे माता पालक या सर्वांची आभार मानले
या कार्यक्रमासाठी जि.प सदस्य मंगेश काकडे, पंचायत समिती सदस्या सपना शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, लोकनियुक्त सरपंच रेलिका जाधव, माजी विस्तार अधिकारी राधा चौगुले, सामाजिक कार्यकर्ते रामदास सोनवणे, अरुण जाधव, ग्रामपंचायत पंचायत सदस्य संतोष पादिर, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाळुंज, सचिन देवकर, शिवाजी डोके. माजी सभापती संगीता वाघ उद्योगपती सचिन गडगे, पत्रकार गोपी शिंदे आदी ग्रामस्थ व माता पालक बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची यशस्वितेसाठी सर्व माता पालक व शाळेतील शिक्षिका छाया डुंबरे, सुनंदा तांबे,नसविता खेत्री. गीतांजली बोऱ्हाडे- वाळुंज तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय चौगुले व शिक्षण तज्ञ सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते डीबी यांना वाळुंज यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!