जुन्नर च्या माणिकडोह येथून २० बिबटे ‘वनतारा’ला रवाना
1 min read
जुन्नर दि.८:- जुन्नर वनविभागातील वाढता मानव-बिबट संघर्ष आणि माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील मर्यादित क्षमता विचारात घेता, येथील २० बिबट्यांचे गुजरात राज्यातील जामनगर येथील ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर
(वनतारा) येथे स्थलांतर करण्यात आले आहे. मागील १० वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात झालेली वाढ आणि संघर्ष क्षेत्रातून पकडलेल्या बिबट्यांची संख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.
