दरवाढीचा भडका उडाला; घरगुती गॅस व व्यावसायिक गॅस चे दर वाढले

1 min read

नवीदिल्ली दि.७:- इराण-इस्त्राइल आणि अमेरिका युद्धाच्या झळा आता भारतामध्ये बसण्यास सुरूवात झाली आहे. युद्धामुळे भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १४.२ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६० रूपयांनी वाढले आहेत. तर १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ११५ रूपयांनी वाढली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नईसह देशभरात नवे दर आजपासून लागू झाले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यावसायिक आस्थापनांसारख्या व्यवसायांवर गॅस दरवाढीचा परिणाम झाला आहे.घरगुती सिलिंडर थेट ६० रुपयांनी महागला आहे. महागाईच्या या धसक्यामुळे सामान्य माणसाचं महिन्याचं बजेट आता पूर्णपणे कोलमडलं आहे. आज ७ मार्चपासूनच हे नवे दर लागू झाल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. एप्रिल २०२५ पासून गॅसचे दर स्थिर होते, पण आजच्या या दरवाढीने एका झटक्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यावसायिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही 115 रुपयांची वाढ झाली आहे.मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचे दर 1720.50 रुपयांवरून 1835 रुपये रुपयांवर पोहोचले आहेत. या वाढीमुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने स्पष्टीकरण दिले आहे. देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. पुरवठा साखळी सुरळीत सुरू आहे. भारताकडे कच्चे तेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. अमेरिकेकडूनही एलपीजीची आयात सुरू झाली आहे. नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!