युद्ध आता आणखीनच धोकादायक वळणावर, इराणचा इस्रायलवर क्लस्टर मिसाइल हल्ला

1 min read

नवी दिल्ली दि.७:- मिडल ईस्टमध्ये सुरू असलेलं इराण-इस्रायल युद्ध आता आणखीनच धोकादायक वळणावर पोहोचलं आहे. ताज्या रिपोर्ट्सनुसार, इराणने क्लस्टर मिसाइलने इस्रायलवर हल्ला केला आहे.या हल्ल्यात इस्रायलच्या अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आलं असून, अनेक ठिकाणी मोठे स्फोट आणि विध्वंस झाल्याच्या बातम्या येत आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण प्रदेशात तणाव आणखी वाढला आहे.क्लस्टर मिसाइल हे एक खास प्रकारचं बॅलिस्टिक मिसाइल असतं. यामध्ये एका मोठ्या वॉरहेडच्या आत अनेक छोटे-छोटे बॉम्ब भरलेले असतात. जेव्हा हे मिसाइल हवेत फुटतं, तेव्हा हे छोटे बॉम्ब एका मोठ्या परिसरात पसरतात.यामुळेच याला अत्यंत धोकादायक शस्त्र मानलं जातं, कारण यामुळे फक्त लष्करी तळच नाही, तर आसपासच्या नागरी वस्त्यांचंही मोठं नुकसान होऊ शकतं. जगातल्या १०० पेक्षा जास्त देशांनी क्लस्टर शस्त्रांवर बंदी घातली आहे. या देशांनी एका आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत याच्या वापरावर, उत्पादनावर आणि साठवणुकीवर बंदी घातली आहे. पण इराण आणि इस्रायल या कराराचा भाग नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर ही बंदी लागू होत नाही.रिपोर्ट्सनुसार, इराणच्या मिसाइल हल्ल्यात इस्रायलच्या अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आलं. हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी सायरन वाजू लागले आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा देण्यात आला. इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमने काही मिसाइल हवेतच रोखण्याचा प्रयत्न केला, पण अनेक मिसाइल जमिनीवर पडल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!