हिंमत असेल तर रोखा! ‘इराणच्या “त्या” व्हिडिओने खळबळ, अमेरिकाही झाली हैराण

1 min read

नवी दिल्ली दि.३:- अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त कारवाईमुळे इराण आक्रमक झाला असून अरब देशांवर हल्ले करत आहे. अरब देशातील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले जात आहे. याच दरम्यानचे इराणने एक खळबळ जनक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था फार्स ने हा व्हिजिओ जारी केला असून इस्रायल आणि अमेरिकेला खुले आव्हान मानले जात आहे.हा इराणचा अंडरग्राउंड बंकरचा व्हिडिओ असून यामध्ये शेकडो ड्रोन्स, मिसाईल्स, आणि अत्याधुनिक रॉकेट लॉन्चर्स यांचा मोठा साठा आहे. तसेच हे अंडग्राउंड बंकर डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेले आहे. मीलोलंब बोगद्यांमध्ये हजारो अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा साठा आहे.इराणे जारी केलेल्या या व्हिडिओत अत्याधुनिक रॉकेट लॉन्चर आणि शेरडो आत्मघातकी ड्रोन्स असून हे अमेरिकेच्या बंकर बस्चर क्षेपणास्त्रांना उत्तर मानले जात आहे. या बंकरमध्ये लांब पल्ल्याचे शाहेद क्षेपणास्त्र देखील आहे. तसेच इराणता राष्ट्रध्वज आणि सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचे फोटो लावलेले आहेत. यामुळे सैनिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!