सह्याद्री व्हॅली आभियांत्रिकी महाविद्यालयाचे ‘स्नेहसंमेलन’ उत्साहात संपन्न
1 min read
राजुरी दि.१:- राजुरी (ता.जुन्नर) येथील महारिया चारीटेबल ट्रस्टचे सह्याद्री व्हॅली आभियांत्रिकी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन “सृजन” २०२६, दिनांक २० ते २८ फेब्रुवारी दरम्यान उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या स्नेह संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष व्ही. आर. दिवाकरण उप अध्यक्ष किशोर पटेल,
सेक्रेटरी गणपत कोरडे, संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण, संचालक नागेश आस्पात, डॉ. के. आर. भानुशाली, प्राचार्य डॉ. संजय झोपे, उपप्राचार्य पी. बालारामडू यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. तद्प्रसंगी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या स्नेह संमेलनातर्गत इनडोअर व आउटडोअर विविध क्रीडा प्रकार घेण्यात आले त्यामध्ये हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट आणि इ स्पोर्ट, बुद्धिबळ, कॅरम म्युझिकल चेअर इत्यादी क्रीडा प्रकारात उत्फूर्त सहभाग नोंदवला. त्याचबरोबर पोस्टर प्रेसेंटेशन, डिजिटल पोस्टर कॉम्पिटिशन, मेहंदी, रंगोली आणि विविध डेज सेलिब्रेट करण्यात आले.
त्यामध्ये मिस मॅच डे, रोज डे चॉकलेट डे, रेट्रो डे, ट्विन्सडे, ट्रॅडिशनल डे आणि हॉरर ड्रामा इत्यादी कलाप्रकारात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा,
म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये एकपात्री अभिनय, समूह गीत गायन, नृत्य, कला, लावणी, नाटक,, इत्यादी. कलाप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले.
या कार्यक्रमांनी स्नेहसंमेलनाची रंगत वाढवली. आठ दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनाच्या “सृजन” थीम अंतर्गत कार्यक्रमांनी प्रा. कविता खताळ प्रा. कविता खेमनर, प्रा. सिताराम कणसे, प्रा.सतीश नेहे प्रा.रांधवन भागवत यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या चांगलीच उंची गाठली. विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहुन पालक तसेच आलेले प्रमुख पाहुणे यांनी उत्स्फूर्त दाद दिली व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
तर परीक्षक म्हणून ग्रंथपाल उद्धव भारती, प्रा. स्वप्नाली कदम प्रा. यांनी परिक्षण केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष व्ही. आर. दिवाकरण उपअध्यक्ष किशोर पटेल, सेक्रेटरी गणपत कोरडे, संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण, संचालक नागेश आस्पात, डॉ. के. आर. भानुशाली, प्राचार्य डॉ. संजय झोपे,
उपप्राचार्य पी. बालारामडू, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर जीवन शिंदे, पप्पू डोंगरे, कॉलेजचे सर्व विभागप्रमुख व मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कविता खताळ आणि प्रा. कविता खेमनर यांनी केले तर आभार प्रा सतीश नेहे यांनी मानले.
