विमान अपघाताचा पहिला अहवाल आला समोर
1 min read
पुणे दि.१:- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता एक महिना पूर्ण झाला असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र अजूनही सुन्न आहे. या भीषण अपघाताच्या कारणांचा शोध घेणाऱ्या विमान अपघात तपास ब्युरोने आपला २२ पानांचा प्राथमिक अहवाल आता प्रसिद्ध केला आहे.
या अहवालातून अपघाताच्या वेळची परिस्थिती आणि तांत्रिक त्रुटींबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विमान कोसळताना आधी झाडावर धडकल्याची धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे.
आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात ब्लॅक बॉक्स आणि कॉकपीट संदर्भात कुठलीही माहिती नाही. या अहवालात केवळ प्राथमिक माहिती आहे. मात्र अंतिम अहवाल यायला वेळ लागणार आहे. अपघातावेळी २ हजार मीटर इतरी दृष्यमानता होती. तर फ्लाईट डाटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
ब्लॅक बॉक्स, कॉकपीट तपासण्यासाठी अमेरिकेन कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. कॉकपीट हाताळण्या साठी अमेरिकेतून टीम भारतात येणार आहे. अपघातामुळे विमानांमध्ये असणारा कॉकपीट आणि FDR डॅमेज झाला होता. त्यातील डाटा सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेतून टीम भारतात येणार आहे.
ज्या कंपनीने हा ब्लॅक बॉक्स बनवला आहे त्या अमेरिकन कंपनीची मदत घेतली जाणार आहे. हा रिपोर्ट अपघाताच्या कारणांची प्राथमिक माहिती देणारा आहे.विमान अपघाता च्या काही सेकंद आधी वैमानिकांचे संभाषण देखील समोर आहे. पायलटने शेवटी मेडे मेडे म्हणण्याऐवजी ओह शिट असं म्हटल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे.
या अपघातात विमानाचे कॉकपिट आणि केबिन पूर्णपणे नष्ट झाले असून केवळ शेपटीचा भाग सुरक्षित राहिला आहे. दुर्घटनेनंतर विमानाने पेट घेतल्याने मोठी हानी झाली, ज्यामुळे फ्लाईट डाटा रेकॉर्डर देखील उष्णतेमुळे खराब झाला आहे. मात्र, तपासासाठी त्यातील रॉ डाटा डाऊनलोड करण्यात तपास यंत्रणेला यश आले आहे.
आणीबाणी यासारख्या परिस्थितीमध्ये MAYDAY कॉल दिला जातो. मेडे कॉल हा शब्द विमान वाहतूक क्षेत्रात संकटाचा इशारा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो. अत्यंत आपत्कालीन परिस्थितीत जिथे धोक्याची शक्यता वाटते, तिथे वैमानिक मेडे कॉल देतो.
विमान वाहतुकीच्या क्षेत्रात मेडे कॉल हा तात्काळ गंभीर संकटाचा इशारा मानला जातो. DGCA ने दिलेल्या टाईम लाईनुसार 8.43. 59 पर्यंत सर्व व्यवस्थित होते.मात्र अवघ्या 14 सेकंदाच असं काय घडलं की वैमानिकाला मे डे हा कॉल देखील देता आला नाही, याच गूढ अद्याप कायम असून त्याचा तपास सुरू आहे.
