आंध्रप्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; २० जणांचा जागीच मृत्यू; ७ गंभीर

1 min read

विशाखापट्टणम दि.१:- आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील समलकोट मंडल येथील वेतलापलेम येथील एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. कारखान्यात २० हून अधिक लोक उपस्थित होते.स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. स्थानिक रहिवाशांनीही मदत केली. जखमींना रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले.गंभीर भाजलेल्यां पैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. स्फोटात मृतदेहांचे तुकडे झाले आणि जवळच्या इमारतींचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. हा आत्तापर्यंतचा राज्यातील सर्वात मोठा स्फोट असल्याची माहिती पर्यटनमंत्री दुर्गेश यांनी दिली आहे. अद्याप संपूर्ण माहिती मिळालेली नाही. सध्या काही जखमी झालेल्या लोकांवर उपचार सुरु आहेत. समरलाकोटा मंडलच्या वेट्टलापलेम गावात झालेल्या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की मृतदेह जवळच्या भातशेतीत पडले आहेत.काकीनाडा सरकारी जनरल हॉस्पिटलच्या अधीक्षकांनी सांगितले की, 90 ते 100 टक्के भाजलेल्या सात रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे. काकीनाडा जिल्ह्यातील वेट्टलापलेम गावात फटाके उत्पादक युनिटमध्ये झालेल्या स्फोटात झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे असे ते म्हणाले. हिरव्यागार भातशेतींमध्ये भयानक दृश्ये दिसत आहे. स्थानिक लोक “बरकालू” (खताच्या पोत्यांपासून बनवलेल्या चादरी) मध्ये मृतदेह घेऊन जाताना दिसले. स्फोटाच्या ठिकाणाहून आग आणि धूर येत होता आणि जखमींना वाचवण्यासाठी तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!