‘रोजगार आणि उद्योजकता’ विषयावर दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

1 min read

निमगाव सावा दि.१:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, निमगाव सावा यांच्या संयुक्त विद्यमाने ” रोजगार आणि उद्योजकता” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना स्वावलंबन, उद्योगाची संधी, तसेच आधुनिक व्यवसायाच्या कल्पना याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे होते. प्रमुख वक्ते डॉ. महावीर शेटीया (एस. एन. जी. कॉलेज पेठ) विद्यार्थ्यांना आजच्या काळात नोकरीपेक्षा व्यवसायाचे महत्त्व, स्टार्टअप संधी, लघुउद्योग, तसेच ग्रामीण भागातील उद्योजकतेच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या भांडवल, नियोजन आणि कौशल्यांबाबत शंका विचारल्या. त्यांना डॉ. सचिन बिडवे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल पडवळ, प्रास्ताविक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. सुभाष घोडे यांनी प्रा.केले, तर प्रा.आकाश धुमाळ यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय व उद्योजकतेविषयी प्रेरणा मिळाली असून भविष्यात स्वयंपूर्ण होण्याचा आत्मविश्वास वाढला. सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सहकार्य आणि विद्यार्थी यांच्या उपस्तिथीत कार्यशाळा उत्साहात पार पडली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!