अभिनेत्री आणि मॉडेल्सच्या स्त्रीबीजांना मिळतोय कोट्यवधींचा भाव! बदलापूरच्या धक्कादायक स्त्रीबीज तस्करी प्रकरण

1 min read

मुंबई दि.१:- बदलापूर शहरात उघडकीस आलेल्या बेकायदे शीर स्त्रीबीज तस्करीच्या प्रकरणाने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणाची व्याप्ती आता वाढताना दिसत असून, या तस्करीचे लागेबांधे केवळ एका शहरापुरते मर्यादित नसून राज्यातील इतर वेगवेगळ्या शहरांशीही जोडले गेल्याचे तपासातून निष्पन्न होत आहे. प्रामुख्याने या संपूर्ण गैरव्यवहाराचे ‘नाशिक कनेक्शन’ आता ठळकपणे समोर आले आहे.पोलिसांच्या आणि संबंधित यंत्रणांच्या तपासात असे आढळून आले आहे की, नाशिक शहरात अधिकृत परवानगी असलेले एक आयव्हीएफ (IVF) सेंटर प्रत्यक्षात ठाणे शहरामध्ये पूर्णपणे बेकायदेशीररित्या चालवले जात होते. या बेकायदेशीर साखळीमध्ये ठाणे आणि उल्हासनगर परिसरातील दोन खाजगी रुग्णालयांचा प्रामुख्याने सहभाग असल्याचे उघड झाले आहे. याच रुग्णालयांच्या माध्यमातून पैशांच्या आमिषाने स्त्रीबीज काढणे, त्याचे रोपण करणे आणि त्याची चढ्या भावाने विक्री करणे असे गंभीर गैरप्रकार राजरोसपणे सुरू होते.या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या महिला आरोपींना सुरुवातीला अटक करण्यात आली होती, त्यांचा वैद्यकीय क्षेत्राशी किंवा आरोग्याशी दूरान्वयेही संबंध नव्हता. तरीही त्या अत्यंत संवेदनशील अशा वैद्यकीय प्रक्रियांमध्ये थेट सहभाग घेत होत्या. या संपूर्ण टोळीचे नियोजन आणि व्यवस्थापन पाहण्याचे काम सुमित सोनकांबळे हा करत होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत या रॅकेटची मुख्य सूत्रधार सुलक्षणा गाडेकर हिच्यासह अश्विनी चाबूकस्वार, मंजुषा वानखेडे आणि एजंट म्हणून काम पाहणारी सोनल गरेवाल यांना बेड्या ठोकल्या आहेत. पैशांच्या लालसेपोटी एकाच महिलेच्या शरीरातून तब्बल ३३ वेळा स्त्रीबीज काढण्यात आल्याचा अतिशय धक्कादायक प्रकारही या चौकशी दरम्यान उघडकीस आला आहे.आरोग्य क्षेत्राला काळिमा फासणारा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तातडीने बदलापूर येथे धाव घेतली आणि या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पाडली.पोलिसांनी या टोळीची कसून चौकशी केली असता, त्यांच्याकडून स्त्रीबीज विक्रीचे एक ‘रेट कार्ड’ (दरपत्रक) हस्तगत करण्यात आले आहे. या दरपत्रकानुसार, प्रत्येक महिलेच्या प्रोफाईलनुसार स्त्रीबीजाची किंमत ठरवली जात होती.अत्यंत गरजू आणि मजुरी करणाऱ्या महिलेचे स्त्रीबीज : २ लाख रुपयेसुंदर दिसणाऱ्या महिलेचे स्त्रीबीज: १० लाख रुपये मॉडेलिंग करणाऱ्या महिलेचे स्त्रीबीज: २५ लाख रुपये खेळाडू महिलेचे स्त्रीबीज: १० लाख ते १ कोटी रुपयांहून अधिक अभिनेत्रीचे स्त्रीबीज: २५ लाख ते थेट कोट्यवधी रुपयांच्या घरात महिला उद्योगपतीचे स्त्रीबीज: १५ लाख ते काही कोटी रुपयांपर्यंतया संपूर्ण बेकायदेशीर बाजारात स्त्रीबीज हे एक ‘प्रीमियम प्रॉडक्ट’ (अतिशय मौल्यवान वस्तू) म्हणून ग्राहकांना विकले जात होते. बदलापूरच्या या स्त्रीबीज तस्करीच्या प्रकरणाने आपल्या आरोग्य व्यवस्थेतील प्रचंड मोठ्या त्रुटी आणि त्यामध्ये फोफावलेले बेकायदेशीर व्यवहारांचे जाळे चव्हाट्या वर आणले आहे. मात्र, वैद्यकीय व्यवस्थेचा असा गैरवापर करून हा प्रकार नेमका किती महिन्यांपासून किंवा वर्षांपासून सुरू होता?यात कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले किंवा निष्काळजीपणा दाखवला? या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आता मिळणे अत्यंत आवश्यक बनले आहे. जोपर्यंत या प्रकरणातील सर्व दोषींवर अत्यंत कडक कायदेशीर कारवाई होत नाही,तोपर्यंत महिलांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा जीवघेणा खेळ थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!