श्रीराम विद्यालयाचा संस्कार गायन स्पर्धेत पुणे विभागात दुसरा
1 min read
पिंपळगाव दि.२५:- रयत शिक्षण संस्थेच्या पिंपळगाव खडकी (ता.आंबेगाव) येथील श्रीराम विद्यालयाचा संस्कार किरण लायगुडे याने लहान गटात गायन स्पर्धेत पुणे विभागात दुसरा क्रमांक मिळविला तसेच याच विद्यालयाची नमस्वी तुषार गोरडे विद्यार्थिनीला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले असल्याची माहिती मुख्याध्यापक डी. पी. फापाळे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रयत शिक्षण संस्था प्रत्येक वर्षी विभागीय पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन करत असते. गायन, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा इ. स्पर्धांचा यामध्ये समावेश असतो. श्रीराम विद्यालयाच्या शिवम हेमंत राजगुरू, मुग्धा हेमंत राजगुरू संस्कार लायगुडे,
नमस्वी गोरडे या विद्यार्थ्यांनी गायन स्पर्धेत सहभाग घेऊन भावगीत व भक्ती गीत वाद्य वृंदासह सादर केले. विद्यालयातील उपशिक्षिका विजया लायगुडे यांचे या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून अभिनंदन करण्यात आले.
