सूर्या करिअर ॲकडमीत नवीन प्रवेश सुरू

1 min read

आळेफाटा दि.२४:- आळेफाटा येथील ‘सुर्या करिअर ॲकडमी’ मध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असल्याची माहिती संचालक श्रीकांत मदने यांनी दिली. आळेफाटा (ता.जुन्नर) येथील सुर्या करिअर ॲकडमी मध्ये सन २०२४- २५ च्या पोलीस भरतीत जवळपास २५० हुन अधिक जणांची निवड झालेली असुन.यामध्ये विशेष करून १३ जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. महाराष्ट्र राज्यात सूर्या करिअर ॲकडमीचा राज्यात डंका आहे. ग्रामीण भागातील व विशेष करून शेतकरी कुटुंबातील अतीशय गरीब परीस्थिती व गरजु मुलामुलींसाठी ही अकॅडमी वरदान ठरत आहे.अद्यावत प्रशिक्षण संस्था असून मैदानी सरावासाठी प्रशस्त ग्राउंड आहे. इयत्ता १२ वी झालेल्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले म्हणून निराश न होता पोलीस,सैनिकी क्षेत्रात तसेच इतर सरळसेवा भरती मध्ये उत्तम करिअर घडवण्याची संधी सुर्या करिअर ॲकडमी ने उपलब्ध करून दिली असुन.अतीशय गरीब कुटुंबातील हे सर्व जण असुन या सर्वांना या संस्थेच्या माध्यमातून गेल्या चौदा वर्षात तीन हजारांपेक्षा जास्त पोलिस, बाराशे पेक्षा जास्त सैनिक, चौदा पी. एस. आय, चार एस.टी.आय, तेरा पेक्षा जास्त तलाठी व इतर सरळसेवा भरतीमध्ये दोनशेहून अधिक जण भरती झालेले आहे. अशी माहिती सुर्या करिअर ॲकडमीचे संचालक श्रीकांत मदने यांनी दिली. मर्यादित जागा असल्याने आपला प्रवेश लवकर निश्चित करण्याचे आवाहन श्रीकांत मदने यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!