गुंजाळवाडी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

1 min read

गुंजाळवाडी दि.२०:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी ता.जुन्नर येथे शिवजयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.छञपती शिवाजी महाराज, मावळे, शिवकन्या यांच्या वेशभूषा यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केल्या.घोषणा व प्रभातफेरीतून सुंदर वातावरण निर्मिती झाली.बालसभेत शिवप्रतिमा पूजन होऊन शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थी भाषणे, शिक्षक,ग्रामस्थ मनोगतातून सर्वांना छानसे शिवविचार ऐकावयास मिळाले.सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थीनींनी छानसी शिवगीते सादर केली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवघोषणेचे सादरीकरण केले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिक्षकवृंद खामकर सर व खोडदे सर यांनी केले.याप्रसंगी प्रशांत बोरचटे यांच्या वतीने उपस्थित सर्वांना खाऊवाटप करण्यात आले.शिवजयंतीच्या निमित्ताने सुजित चंद्रकांत जगताप यांनी शालेय विद्यार्थ्यांना वडापावचे वाटप केले.याप्रसंगी बबन गुंजाळ,बारकू बोरचटे किसन बोरचटे,संगिता गुंजाळ,प्रशांत बोरचटे,दिपाली बोरचटे, सतिश बोरचटे, जयसिंग पवार,रोहिणी बोरचटे, माणिक मुजावर, बाबु मुजावर, सुदाम गोसावी तसेच शालेय विद्यार्थी, अनेक शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!