भास्कर गाडगे प्रतिष्ठानकडून शिवभक्तांना नाश्त्याची सोय
1 min read
आणे दि.१९:- आणे (ता.जुन्नर) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा तर्फे शिवजन्मभूमी मध्ये येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी सर्वांना नाश्त्याची सोय करण्यात आली. शेव चिवडा, लाडू पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले.
बुधवार दि १८ रोजी रात्री शिवनेरी किल्ल्यावर जाणाऱ्या भाविकांसाठी ही सोय करण्यात आली होती. शेकडो शिवभक्तांना याचा लाभ मिळाला. दरवर्षी नियमित भास्कर गाडगे प्रतिष्ठानच्या वतीने हे वाटप करण्यात येते. यावेळी युवासेना उपतालुकाप्रमुख अभिषेक गवळी तसेच शिवसेना विभाग प्रमुख पांडू गाडेकर,
शिवसेना आणि आणे शाखाप्रमुख संतोष देशमुख, कासम चौगुले, महेश दाते, रोहित दाते,हर्षल दाते, अनिकेत दाते, ऋषी थोरात, ऋषिकेश थोरात, महेश थोरात, सागर बोरुडे, आदिनाथ बोरुडे, कासन कौसे, रोहित थोरात, अश्वमेध थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.
