शिवभोजन थाळी केंद्रात जुगार अड्डा;चाकणमध्ये पोलिसांचा छापा

1 min read

चाकण दि.१९:-चाकण बस स्टॉप शेजारील एका शिवभोजन थाळी केंद्रात बेकायदेशीरपणे जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करून मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी (१६ फेब्रुवारी) दुपारी १२:३५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील भागवत यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतिष गुलाब जोगदंड (४५, खंडोबा माळ, चाकण), भास्कर आरोबा भिसे (५२, नाणेकरवाडी, खेड) आणि शक्ती हनुमंत पोतले (३७, मोहितेवाडी, खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे प्रतिबंधित जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १५ हजार ६०० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य आणि रोकड जप्त केली आहे. चाकण दक्षिण पोलीस तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!