महा-ई-सेवा केंद्रांमधून होतेय लूट; तक्रार आल्यास कडक दंडात्मक कारवाई
1 min read
मंचर दि.१८:-महा-ई-सेवा केंद्रांमधून विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी जास्त पैसे आकारात असल्याच्या अनेक तक्रारी आल्याने तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी पालकांना, विद्याथ्यांना याबाबत लेखी तक्रार करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
विविध शासकीय दाखल्यांसाठी शासनाने ठराविक शुल्क (Fees) निश्चित केले आहे. मात्र, काही केद्रांवर नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी प्रशासनाच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील
सर्व नागरिकांना आणि पालकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही महा-ई सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैशांची मागणी केल्यास, नागरिकांनी तात्काळ पुराव्यासह तहसीलदार कार्यालयाकडे लेखी तक्रार नोंदवावी.
अशा केंद्रांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तालुक्यातील पारदर्शक कारभारासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. वाघ यांनी केले आहे.
