आईच्या सन्मानाचा उत्सव; रॉयल स्कूलमध्ये मातृदिन उत्साहात साजरा

1 min read

मोशी दि.१७:- आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. आईचा सन्मान करण्यासाठी एक दिवस पुरेसा नसतो. आई केवळ आपल्याला जीवन देत नाही, तर आयुष्यभर प्रेम, संस्कार आणि जीवनाचे अमूल्य धडे देते. आज आपण जे काही आहोत, त्यामागे आपल्या आईचे मोठे योगदान आहे, याचा विचार आपल्या धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ काढून करणे आवश्यक आहे.मातृदिनाची सुरुवात प्राचीन ग्रीसमध्ये झाल्याचे मानले जाते. प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीत मातृदेवता रियाची पूजा केली जात असे. पुढे ख्रिश्चन धर्माने मदर मेरीच्या सन्मानार्थ या परंपरेचा स्वीकार केला. या उत्सवाला ‘मदरिंग संडे’ असे नाव देण्यात आले आणि कालांतराने तो जागतिक स्तरावर मातृदिन म्हणून साजरा होऊ लागला.या पार्श्वभूमीवर रॉयल स्कूलमध्ये मातृदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये गाणी, कविता, नृत्य सादरीकरण तसेच छोट्या भेटवस्तूंचा समावेश होता.कार्यक्रमादरम्यान मुलांनी आईच्या प्रेमाचे,त्यागाचे आणि ममतेचे महत्त्व आपल्या सादरीकरणातून प्रभावीपणे मांडले.• भावपूर्ण वातावरण: मुलांनी आईसाठी सादर केलेली गाणी व कविता ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, त्यामुळे शाळेत अत्यंत भावनिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले.प्रसंगी संस्थेच्या संस्थापिका स्वाती ढेरंगे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व म्हणाल्या शाळेत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आईविषयी आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. मातृदिना निमित्त घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!