बेल्हेच्या प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

1 min read

बेल्हे दि.१७:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं- १ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ यांनी केले. पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य राजेंद्र पिंगट यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या स्मिता कणसे , सुनील चौरे, यांनी मनोगत व्यक्त करत शाळेप्रती बांधिलकी जपत शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते विजू काका घोडके यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सरपंच मनिषा डावखर, सावकार पिंगट, ग्रामपंचायत सदस्या कमल घोडे, मंदाकिनी नायकोडी, पल्लवी भंडारी,योगिता बांगर,विद्या भालेराव ,नाजिम बेपारी,कैलास औटी,गणेश चोरे,निलेश कणसे,डॉ. खोमणे, सागर लामखडे इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून बालचमुंना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राबवलेल्या विविध उपक्रमांचे ‘आमची शाळा आमचे उपक्रम’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणारे माजी अध्यक्ष गणेश चोरे ,नारायण पवार, विजय देशपांडे ,सुप्रिया बांगर दादाभाऊ मुलमुले ,सुनील सावंत स्वप्निल शिंदे, प्रितम मुंजाळ यांचा सन्मान सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.शाळेतील सर्व विद्यार्थांनी यामध्ये सहभाग घेत विविध कलागुणांचा अविष्कार सादर केला. गणेश वंदना, देशभक्तीपर गीत, लावणी, गोंधळ, हिंदी गीत, धर्मेंद्र रिमिक्स, छावा,कोळीगीत,अशा अनेक गीतांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. पालकांनी भरपूर बक्षीस देत मुलांवर कौतुकाचा वर्षाव केला.प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे व अनेक शिक्षकांनी उपस्थीत राहून विद्यार्थांचे कौतुक करत सुंदर आयोजन व नियोजन केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचा सन्मान केला.वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पालकांचे व ग्रामस्थांचं भरपूर सहकार्य लाभले.मुलांच्या अन्नदानासाठी एक लक्ष रुपयाचा भरघोस निधी ग्रामस्थांनी दिला. त्याचबरोबर गीतांसाठी कार्यक्रमाच्या खर्चासाठी सहप्रयोजक, लकी ड्रॉ यासाठी सुद्धा पालकांचे खूप सहकार्य लाभले. याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ उपाध्यक्ष वैशाली मटाले सदस्य ईश्वर पिंगट, विलास पिंगट,गोरक्षनाथ शिरतर प्रशांत औटी,शेखर पिंगट स्वाती कोकणे,नसरीन पठाण, पायल सोनवणे,रेश्मा बनकर,सुवर्णा कदम, प्रज्ञा शर्मा, यांनी उपस्थित सर्वांचा सन्मान केला. शाळेच्या उपशिक्षिका मीरा बेलकर,हरिदास घोडे रोहिदास साळवे, नूरजहाँ पटेल, प्रविणा नायकोडी अंजना चौरे ,सुषमा गाडेकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. अशोक बांगर व संतोष डुकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.शाळेचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर यांनी कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!