कावळपिंपरी येथे बिबट्या जेरबंद

1 min read

बेल्हे दि.१३:- कावळ पिंपरी (ता.जुन्नर) येथे ऊसाच्या शेताजवळ लावलेल्या पिंजऱ्यात चार ते पाच महिन्याचा मादी बिबट जेरबंद झाला आहे. शुक्रवार दि.१३ रोजी पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे. सदर बिबट्याची रवानगी माणिक डोह येथील बिबट निवारा केंद्रात केली आहे. अशी माहिती बेल्हे वनपाल नीलम ढोबळे व वनरक्षक एस. एन. केदारी यांनी दिली.कावळपिंपरी येथील कृष्णा शिरतर यांच्या गट नंबर १४२ (१) या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला.या बिबट्याने गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला होता. अनेक पाळी प्राण्यांवरती बिबट्याने हल्ले केले होते.हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. वाढत्या बिबट्यांमुळे परिसरात विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरला आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी गणेश पाबळे, कृष्णा शिरतर, संदीप जाधव यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!