पुणे जिल्हा नियोजन समितीची (DPC) महत्त्वाची बैठक संपन्न:- खासदार डॉ.अमोल कोल्हे
1 min read
पुणे दि.१३:- पुणे जिल्हा नियोजन समितीची (DPC) महत्त्वाची बैठक उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे संपन्न झाली. सध्या दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.
बैठकीच्या सुरुवातीला लोकनेते स्व. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या महत्त्वपूर्ण बैठकीस राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री मा. माधुरी मिसाळ, खासदार सुप्रिया सुळे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या:
• शिवशंभू कॉरिडोर: किल्ले शिवनेरी ते वढू बुद्रुक या मार्गाला ‘शिवशंभू कॉरिडोर’ म्हणून विकसित करून ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तातडीने मंजुरी द्यावी.• इंद्रायणी मेडिसिटी: लाखो नागरिकांना स्वस्त आणि सुसज्ज आरोग्य सुविधा देण्यासाठी ‘इंद्रायणी मेडिसिटी’ हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावा.
• मानव-वन्यजीव संघर्ष: जुन्नर वनविभागातील बिबट्यांच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘Wildlife Combat Centre’ ची उभारणी करावी.• सर्पदंश उपचार केंद्र: जुन्नर तालुक्यातील अपटाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा वार्षिक आराखड्यांतर्गत विशेष ‘Snake Bite Trauma Centre’ ला मंजुरी मिळावी.
• दुष्काळमुक्ती व पाणी प्रश्न: कोपरे-मांडवे येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पासाठी जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, दुर्गम भागातील को.प. बंधाऱ्यांच्या कामांसाठी आर्थिक मापदंडात बदल करण्याची मागणी केली आहे.
सन २०२६-२७ च्या १,०३२.८८ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, यामध्ये ग्रामीण विकास, आरोग्य पायाभूत सुविधा आणि महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला जाणार आहे.
शिरूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.असे खासदार कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
