कल्याण -अहिल्यानगर महामार्गांवर विद्यार्थ्यांच्या सहल बसचा अपघात
1 min read
ओतूर दि.१२:- पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावाजवळ आळेफाटा बाजू कडून कल्याण दिशेने जाणाऱ्या सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एसटी बसचा अपघात घडला घडल्याची घटना घडली आहे. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाल्याचे घटना गुरुवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी शहाली तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील शाळेची शैक्षणिक सहल बस असल्याचे निदर्शनास आले आहे. बसमध्ये ३० ते ३५ विद्यार्थी व शिक्षक असून बस मधील काही लहान मुले व शिक्षक किरकोळ जखमी झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच डुंबरवाडी टोल नाक्याचे कर्मचारी खामुंडी गावचे तरुण तातडीने घटनास्थळी पोहचले. जखमीना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठविण्यास मदत केली आहे.ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस नाईक
शाम जायभाये, आशिष जगताप, शंकर कोबल,किशोर बर्डे, विश्वास केदार, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, पोलीस पाटील किरण भोर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरू केले.
