मॉडर्न मध्ये हुतात्मा दिन साजरा

1 min read

बेल्हे दि.३०:-मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे (ता.जुन्नर) येथे देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या अमर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी हुतात्मा दिन अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे ट्रस्टी, प्राचार्या, सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी श्रद्धांजली वाहिली.यावेळी उपस्थित शिक्षकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी व अखंडतेसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा व सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे आवाहन केले. दोन मिनिटांचे मौन पाळून अमर हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!