राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्जुले हर्या येथे हुतात्मा दिन साजरा

1 min read

कर्जुले हर्या दि.३०:-राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथे देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या अमर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी हुतात्मा दिन अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुलकुमार एस. हिंगोले यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या अध्यक्षा मीरा आहेर उपस्थित होत्या. संस्थेचे सचिव मा. किरण एल. आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे तसेच उपप्राचार्य डॉ. कृपाल पवार यांनीही हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात देशाच्या स्वातंत्र्यासाठी व अखंडतेसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा व सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी,असे आवाहन केले.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन मिनिटांचे मौन पाळून अमर हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!