बांगरवाडीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
1 min read
बांगरवाडी दि.२७:- जिल्हा परिषद शाळा कदमवस्ती (बांगरवाडी) बेल्हे तालुका जुन्नर पुणे येथे 77 वा प्रजासत्ता दिन उत्साहात साजरा करण्यात आला, सकाळी जिल्हापरिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी संतोष ढगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी राष्ट्रगीत गायन करण्यात आले, त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम, संगीत, कवायत तसेच देशभक्तीपर गीतांचे सुंदर सादरीकरण केले,विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून शिस्त, एकता व देश प्रेमाचा संदेश देण्यात आला,
यावेळी शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी, गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, पालक, माता, भगिनी, तसेच अंगणवाडी शिक्षिका, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
