सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

1 min read

राजुरी दि.२७:- राजुरी (ता.जुन्नर) येथील सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त व्हाईस चेअरमन किशोर पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. तद्प्रसंगी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथ संचालन सादर केले आणि विविध कवायती सादर करून ध्वजाला सलामी दिली. यावेळी प्रमुख उपस्थिती, व्हाईस चेरमन किशोर पटेल, खजिनदार सचिन चव्हान, उपप्राचार्य पी. बालारामडू, मुख्याध्यापक सचिन डेरे, विभागप्रमुख डॉ. मनोज कुमार, प्रा. भागवत रांधवण, प्रा. मनिकंठम रेड्डी, ग्रंथपाल उध्दव भारती, प्रा. कविता खताळ, प्रा. दिव्या राहणे, प्रा. कविता खेमनार, प्रा. अश्विनी हाडवळे, प्रा. मिनाज पटेल आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी डुंबरे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!