व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन गौरवपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा

1 min read

वडगाव कांदळी दि.२६:-विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी, कांदळी येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन अत्यंत गौरवपूर्ण, शिस्तबद्ध व देशभक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाळकृष्ण एरंडे (अधीक्षक, रेल डाक सेवा – पुणे) यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या शुभहस्ते व अन्य मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देत राष्ट्रगीत सादर केले.या प्रसंगी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, सेक्रेटरी विजय पारखे, खजिनदार शिवाजी बांगर, विश्वस्त विक्रांत काळे, विश्वस्त वसंत पाडेकर, तसेच पांडुरंग गहिने (सभासद), तुषार गहिने, जयेश पाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमासाठी मंगल शिवाजी बांगर यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच फकीरा कोरडे, विविध क्षेत्रात कार्यरत सामाजिक कार्यकर्ते, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत व ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय ध्वजगीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परेड, कवायत (ड्रिल), देशभक्तीपर गीत, नृत्यप्रयोग, स्केटिंग डेमो, पिरॅमिड फॉर्मेशन व रायफल शूटिंग डेमो सादर करून उपस्थितांची मने जिंकली.विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी व मराठी भाषांमध्ये प्रभावी भाषणे सादर केली.पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मातांचा बक्षीस वितरण समारंभ, तसेच “Best from Waste ” या थीम वर आधारित “कला व हस्तकला “प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व सर्जनशीलतेचे कौतुक करण्यात आले.प्रमुख पाहुणे बाळकृष्ण एरंडे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना देशसेवा, शिस्त, कर्तव्यभावना व राष्ट्रप्रेम यांचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे यांनी पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी ज्या काही सोयी सुविधा तसेच खेळासाठीचे अधिक मैदान व त्यातील विविध उपकरणे या सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल विशेष माहिती आपल्या भाषणातून दिली.
पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किशोर काकडे, सदस्य सचिन बढे, सत्यवान काळे, योजना भोर, स्वाती काकडे, सौ. वर्षा बढे, सुजाता भोर, सारिका आग्रे आदी मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी साईश्री खिल्लारी व भूमी रावळकर यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने केले.मान्यवरांचा परिचय व सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन शिक्षिका पुनम नरवडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका मनिषा हांडे यांनी केले.कलाशिक्षक रोशन बनकर यांनी सहकारी शिक्षक व निवडक विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट सजावट व फलक लेखन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, क्रीडा शिक्षक, नृत्य शिक्षक, कलाशिक्षक, विषय शिक्षक , वर्गशिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी सर्वांना उत्कृष्ट व योग्य मार्गदर्शन केले. तसेच समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी आपल्या चिकाटी, मेहनत व शिस्तीच्या जोरावर कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अंकुश सोनवणे व सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!