ओतूर जि. प. प्राथमिक शाळा जिल्हास्तरीय स्पर्धेत अव्वल

1 min read

ओतूर दि.२५:- ओतूर जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ने यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा महोत्सवांतर्गत नुकत्याच प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. तसेच लेझीम स्पर्धेत मुलांच्या लहान गटाने तृतीय क्रमांक मिळविला आहे.फुलगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत लहान गट प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवते शाळेने जिल्हास्तरीयवर आपली गुणवत्ता सिद्ध केली. लेझीम (मुले : लहान गट) स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करीत तृतीय क्रमांक पटकाविला, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा डुंबरे यांनी दिली.जिल्हास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत राजवर्धन सुपेकर व युगंधर मादलकर यांनी प्रभावी कामगिरी करीत बाजी मारली. लेझीम संघाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक परंपरेचे दर्शन घडवत सुंदर आणि देखणे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षिका माधुरी शेटे, वनिता जाधव, सतीश नलावडे, सुदेशणा गाडवे, उषा भवारी, ज्योती शिरसाठ, रूपाली गायकवाड, यामिनी बुट्ट व संगीता ढाकणे यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन डुंबरे, सदस्य नितीन पानसेरे, जितेंद्र घुले, प्रतीक्षा ढोकळे, पूजा दिवेकर, विद्या हाडवळे, कविता डुंबरे, डॉ. रेशमा डुंबरे, सुधीर डेरे, सरपंच छाया तांबे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, समितीचे सर्व सदस्य, केंद्रप्रमुख कमलाकांत मुंदे, गटशिक्षण अधिकारी लांडे, विस्तार अधिकारी गोडसे व पालकवर्ग व मुख्याध्यापिका सीमा डुंबरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!