पिंपरखेड येथे NSS विशेष श्रमसंस्कार शिबिर; फार्मसी विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान
1 min read
बेल्हे दि.२५:- श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, माळवाडी (बोटा) तर्फे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर पिंपरखेड येथे उत्साहात पार पडले.
“समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी गावातील सार्वजनिक ठिकाणे व परिसराची स्वच्छता केली.
या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे संचालक डॉ. शिवाजीराव पोखरकर व सचिव डॉ. अमित पोखरकर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले. प्राचार्य डॉ. सागर सांगळे व प्रा.निशा वरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सरपंच राजेंद्र दाभाडे, उपसरपंच देवराम वरे, प्रगतशील शेतकरी रमेश वरे, ग्रा.वि.शि. अध्यक्ष खुशाल बोंबे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करून संस्थेचे आभार मानले.
