हौसाबाई गाडगे यांचा ७१ वा अभिष्टचिंतन सोहळा

1 min read

निमगाव सावा दि.२२:- हौसाबाई विठ्ठल गाडगे यांचा ७१ वा अभिष्टचिंतन सोहळा रविवार दि. २५ रोजी साजरा करण्यांत येणार आहे. त्याप्रसंगी संध्याकाळी ७:३० ते ८ या वेळात शिवव्याख्याते सचिन भोजने यांचे आईची थोरवी या विषयावरती व्याख्यान होणार आहे. रात्री ८ते ८:30 या वेळामध्ये अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. आणि रात्रीसाठी वाढदिवसावर आधारित गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. तरी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आमच्या मातोश्रीला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहावे सातत्याने आमच्या मातोश्रीचा हा सलग चार वर्षे आम्ही अभिष्टचिंतन सोहळा साजरा करत आहे. आणि याही वर्षी ७१ वा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करत आहे. आईने आपल्या कष्टातून खूप काही कमावले खूप काही केलंय म्हणून तिच्या असणाऱ्या गाडगे परिवाराने व मुलांनी मुलींनी एकत्र मिळून आईचा अभिष्टचिंतन सोहळा करण्याचे ठरवले. एक मुलगा सुनिल गाडगे भारतीय लष्करामध्ये रिटायरमेंट होऊन आता लोणावळा या ठिकाणी काम करत आहे. दुसरा मुलगा गणेश गाडगे देखील होमगार्ड मध्ये काम करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!