श्रमदानातून बांधले वनराई बंधारे
1 min read
जाधववाडी दि.२२:- सितारंग चॅरिटेबल सोसायटी संचलित, श्रीमती सीताबाई रंगुजी शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार निवासी शिबिर हे जाधववाडी (ता-जुन्नर) येथे दिनांक 16 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडले.
या शिबिर कालावधीत स्वयंसेवकांनी जाधववाडी गावात श्रमदान करत वृक्षसंवर्धन, ग्राम सर्वे ,वनराई बंधारे यांसारखे उपक्रम राबवून मंदिरे परिसर, ग्रामपंचायत परिसर, शाळा परिसर, आदी ठिकाणे स्वच्छ केली. यावेळी विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली होती.
यामध्ये दुपार क्षेत्रात डॉ. तुकाराम गुंजाळ यांचे करिअर गाईडन्स प्रा. गणेश शिंदे यांचे सामाजिक जडणघडणीत युवकांची भूमिका, डॉ.रामदास गाडेकर यांचे महाविद्यालयीन जीवनात एनएसएस चे महत्व तसेच जाधववाडी गावचे पोलीस पाटील उत्तम मारुती जाधव यांचे जलसंधारण: एग्रीकल्चर, सेव्ह वॉटर अँड मनी,
या विषयावर तर प्रा. राजेश मोरे यांचे आरोग्य हीच संपदा या विषयावर व्याख्याने पार पडली. या कालावधीत सितारंग चॅरिटेबल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सिताराम रंगुजी शिंदे उर्फ दादा, सचिव विनायक शिंदे खजिनदार राजीव शिंदे, कार्याध्यक्ष सारंग शिंदे, तसेच अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर येथील डाॅ. रमेश गोपाळे,
बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे येथील प्रा.डॉ. दत्तात्रय चव्हाण, आश्रम शाळेचे सहयोगी शिक्षक डॉ. डुकरे सर, तर राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. रामदास गाडेकर आदी मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या. या शिबिराच्या समारोप प्रसंगी जाधववाडी गावचे सरपंच अजित जाधव, उपसरपंच दत्तात्रय शेटे,
जाधववाडी गावचे पोलीस पाटील उत्तम मारुती जाधव, आरोग्य सेविका आशा जाधव, ज्योती जाधव, प्रगतशील शेतकरी बाबाजी भोर, सीताबाई रंगुजी शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ तुकाराम धोंडीबा गुंजाळ, इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
या शिबिरासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. वैष्णवी बांगर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी व समस्त ग्रामस्थ जाधववाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रा. राजेश मोरे यांनी प्रास्ताविक तर प्रा. गणेश शिंदे यांनी आभार मानले.
