वळसे पाटील महाविद्यालयाची श्रावणी गाडगे निबंध स्पर्धेत प्रथम

1 min read

निमगाव सावा दि.२०:- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अळकुटी. ता. पारनेर, जि. अहिल्यानगर व सहकारमहर्षी बाळासाहेब बाबर सार्वजनिक वाचनालय वडनेर बु. यांचे सयुंक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय महाविद्यालयीन निबंध व वक्तृत्व स्पर्धा सन २०२५-२६ (वर्ष दुसरे) या स्पर्धांचे आयोजन दि.१९ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले होते.या स्पर्धेत श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला,

वाणिज्य व विज्ञान महाद्यालयातील S.Y.B.Sc ची विद्यार्थिनी गाडगे श्रावणी दिपक हिने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.तसेच वक्तृत्व स्पर्धेत अनुष्का अवचार आणि विवेक कोरडे यांनीही सहभाग घेतला. श्रावणी गाडगे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, संस्था प्रतिनिधी कविता पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख सोनाली ढोबळे तसेच सर्व संचालक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!