ग्रामीण जिल्हास्तरीय मर्दानी युद्धकलेत व्ही.जे स्कूलच्या शौर्य काकडेची सुवर्ण कामगिरी

1 min read

वडगाव कांदळी दि.२०:-पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण जिल्हास्तरीय “सीलबम मर्दानी युद्ध कला” स्पर्धा शनिवार दि. 18 जानेवारी रोजी सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल, बारामती येथे यशस्वीपणे पार पडल्या.या स्पर्धेत व्हि. जे. इंटरनॅशनल स्कूल वडगाव कांदळी (ता.जुन्नर) च्या 14 वर्षे वयोगटात सहभागी झालेल्या शौर्य किशोर काकडे इयत्ता सहावी याने आपल्या उत्कृष्ट कौशल्य, ताकद,चपळता व आत्मविश्वासाच्या जोरावर सुवर्णपदकाची कमाई करत उल्लेखनीय यश संपादन केले.शौर्यने स्पर्धेदरम्यान दाखवलेली एकाग्रता, शिस्तबद्ध सराव आणि मर्दानी युद्धकलेतील तंत्रज्ञान पाहून परीक्षक व उपस्थितांनी त्याचे विशेष कौतुक केले. या घवघवीत यशामुळे शौर्यची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली असून त्याच्याकडून पुढील स्तरावरही उज्ज्वल कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या यशाबद्दल शौर्यचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी क्रीडाप्रेमी व शिक्षण क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी शौर्यच्या यशासाठी त्याचे व प्रशिक्षक किशोर काकडे यांचेही विशेष कौतुक केले.विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांनी देखील शौर्यचे विशेष अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!